शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

आयुक्तालयासाठी लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:05 AM

पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न, वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न, वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी प्रमुख कार्यालये शहरात आणणे या विषयावर राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे चिंचवड, भोसरी आणि पिंपरीतील आमदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधींनी विविध विषय मांडण्याची तयारी केली आहे. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण रखडल्याने निर्माण झालेला वाहतुकीचा प्रश्न, पिंपरीतील वायसीएममध्ये वैद्यकीय कार्यालय सुरू करणे, शहराचे नागरीकरण वाढत असताना शहर सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांना कामासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी प्रमुख कार्यालये शहरात आणणे, शहर परिसरामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, या इमारती आणि खेळाच्या मैदानांची दुरवस्था झाली आहे. कामगार कल्याण मंडळात सुमारे ३ हजार कामगारांची नोंदणी झाली असून, विविध गैरसोयींमुळे कामगारांना विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पुणे विद्यापीठ परिसरात मारामारीच्या अनेक घटना घडत असून, सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. मोशी आणि पुनावळे येथील कचरा डेपोची जागा अपुरी पडत आहे. कचरा नियोजनासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, आदी प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडकरांना दिलेल्या आश्वासनानुसार अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करणे, वाहतुकीचा प्रश्न सोडविणे, तसेच पिंपरीत महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे या विषयावर आवाज उठविणार आहे. तसेच पुण्यातील जिल्हास्तरीय कार्यालये पिंपरी-चिंचवडमध्ये कशी आणता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.- लक्ष्मण जगताप, आमदार, शहराध्यक्ष, भाजपाशहराची लोकसंख्या २० लाखावर गेली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. तसेच पुणे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. कामगार कल्याण मंडळाच्या इमारतींची दुरवस्था आहे. तसेच विविध योजनांचा लाभ शहरवासीयांना करून देण्याची गरज आहे. तसेच पवना, मुळा, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा लक्षवेधी मांडणार आहे.- महेश लांडगे, आमदार, भोसरीस्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे तसेच पवना, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, याबाबत लक्षवेधी मांडणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत. त्या झोपड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत पुनर्वसन करावे. प्राधिकरणाच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त जागांची भरती करावी, आदी मुद्दे उपस्थित करणार आहे. - गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी