नोटबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावर नाही- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:57 AM2018-09-10T01:57:46+5:302018-09-10T01:57:55+5:30
सध्या राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका मोठ्या खडतर परिस्थितीतून जात आहेत. नोटबंदी व जीएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली नाही.
बारामती : सध्या राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका मोठ्या खडतर परिस्थितीतून जात आहेत. नोटबंदी व जीएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली नाही. तरी अशा परिस्थितीत सहकारी बँका चांगली कामगिरी करीत आहेत, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती सहकारी बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ९) बारामती येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते म्हणाले, की बारामती बँकेनेही या कालावधीत चांगली शाखावाढ, कर्जवाटप, ठेवीमध्ये वाढ व माहिती तंत्रज्ञानात प्रगती अशा अनेक क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या ठेवी १५६४.९३ कोटी रुपये व कर्जवाटप १०२५.८९ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरू केले. बँकेचे सभासद करीम बागवान, शेखर कोठारी, प्रा. ज्ञानदेव बुरुंगुले, डॉ. विजयकुमार भिसे, सूर्यकांतशेठ गादिया या व इतर सभासदांनी आपल्या सूचना सभेपुढे मांडल्या.
या सभेस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, संभाजी होळकर, श्री सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे संचालक मदनराव देवकाते, इम्तियाज शिकिलकर, पोपट तुपे, बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजय
तुपे, सुभाष जांभळकर, उद्धव गावडे, सुरेश देवकाते, विजय गालिंदे,
कपिल बोरावके, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, नुपूर शहा, प्रीतम
पहाडे, सतीश सालपे, कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्यासह सरव्यवस्थापक रवींद्र बनकर, विनोद रावळ व त्यांचे
सहकारी सेवकवर्ग उपस्थित होते. उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी आभार मानले.