पुणे : मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून दिवसभर थांबणारे आणि मतदान केंद्राबाहेर एखाद्या टेबलावर थांबणारे पोलिंग एजंट हे कोणत्याही उमेदवारांचा महत्त्वाचा कणा़ त्यामुळे या पोलिंग एजंटने आपले काम चोख आणि एका जागी बसून करावे यासाठी त्यांची तेवढीच काळजी उमेदवार व त्याचे प्रतिनिधी घेताना दिसत होते़ या पोलिंग एजंटना सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केंद्रांवर हजर राहण्यास सांगण्यात आले होते़ त्यानुसार प्रमुख उमेदवारांचे प्रतिनिधी सकाळीच मतदान केंद्रांवर उपस्थित होते़ त्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिनचे सील उघडून त्यात अगोदर कोणतेही मत टाकण्यात आलेले नाही, हे दाखविण्यात आले़ त्यानंतर डमी मतदान करून ज्या उमेदवारांना मत दिले, त्याच उमेदवारांना मत दाखविले जात असल्याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करून दाखविण्यात आले़ पोलिंग एजंटचे त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होते़ आलेल्या मतदारांची नोंद घेऊन मतदार यादीवर खूण करणे ही प्रमुख जबाबदारी असते़ त्यात मतदान केंद्रावर कशी गर्दी आहे, त्यावर त्या एजंटला किती आणि केव्हा जादा काम करावे लागेल, हे अवलंबून असते़ अनेक उमेदवारांनी या पोलिंग एजंटला ज्यांच्या जागेवरच चहा, नाश्ता आणि त्यानंतर दुपारचे जेवण पुरविले़ काही एजंटना नाश्ता उशिरा मिळाला़ अनेक उमेदवारांनी या एजंटांना पुरी भाजी, तर काहींना व्हेज पुलाव दुपारी जेवणासाठी पुरविला़ त्याबरोबर मिनरल बॉटलही देण्यात आल्या. (प्रतिनिधी) एजंटांना जेवण पुरविण्याची जबाबदारी स्वतंत्र कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती़ गणेशखिंड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथील मतदान केंद्रात खूप आतपर्यंत चालत जावे लागते़ या कार्यकर्त्याला दोनदा हेलपाटा मारावा लागला असता़ त्यामुळे या एजंटांना जेवण व पाणी बॉटल पुरविणाऱ्या तरुणाने आपल्या जीन्स पँटच्या चारही खिशामध्ये चार पाण्याच्या बाटल्या घातल्या व दोन्ही हातात फूड पॅकेट घेऊन तो आतमध्ये चालत गेला़ अनेक उमेदवारांनी पोलिंग एजंटांना नाश्ता, जेवण पुरविण्यासाठी स्वतंत्र गाडी ठेवली होती़ पाण्याचीही व्यवस्था नाही अनेक केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले. प्रभाग ३३ मधील एका केंद्रात सोमवारी संपूर्ण फरशीवर पाणी पडले होते. कर्मचाऱ्यांनीच हे पाणी पुसून स्वच्छता केली. तसेच स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागला. रात्री मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली व्यवस्था नसल्याने मनस्ताप सहन करावा लागल्याचे एका केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही कर्मचारी उपाशीच काही केंद्रांवर दुपारी मतदान केंद्रांवर गर्दी असल्याने कर्मचाऱ्यांना जेवणासाठीही वेळ मिळाला नाही. बिस्किटे, वेफर्स, फळे खावून त्यांना दिवसभर काम करावे लागले. काही केंद्रांच्या जवळपास हॉटेल किंवा छोटी दुकानेही नसल्याने या कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागले. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी त्यांना वडापाव, भेळ असे खायला आणून दिले. तसेच पाण्याचीही व्यवस्था त्यांनीच केली. तेही मतदान केंद्रावरील गर्दी तुरळक झाल्यानंतर खाण्याची संधी मिळत होती.
पोलिंग एजंटांसाठी काहीही
By admin | Published: February 22, 2017 3:22 AM