पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करून घेणाऱ्या पुणे, नाशिक, नगर येथील १७ महाविद्यालयांना उच्च शिक्षण विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यापैकी पुण्यातील ९ महाविद्यालयांचा समावेश आहे. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठांतर्गत ही सर्व महाविद्यालये आहेत. वारंवार सूचना देऊनही नॅक मूल्यांकन न करून घेतल्याने अनुदान का थांबवू नये; तसेच विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे संगणकीकरण का रद्द करण्यात येऊ नये, असा प्रश्न या नोटीसमध्ये आला आहे. पुण्यातील कला आणि वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आकुर्डी, गेनबा सोपानराव मोझे विद्यालय येरवडा, कला महाविद्यालय भिगवण, कला व वाणिज्य महाविद्यालय तळेगाव ढमढेरे, कला व वाणिज्य महाविद्यालय शिरूर, के. जी. कटारिया महाविद्यालय दौंड, वसंराव पवार विधी महाविद्यालय बारामती, अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगुट आदींचा समावेश आहे.
नॅकच्या सूचना धुडकाविणाऱ्या १७ कॉलेजना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2015 12:39 AM