भोर शहरातील करोना बाधितांची संख्या वाढत असताना त्यावर उपाय म्हणुन भोर नगर पालिका प्रशासनाने शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्याची रँपिड अँन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.भोर शहरातील ५०८ व्यापार उद्योग करणाऱ्या व्यावसायीकांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती भोर नगर पालिकेचे मुख्याधिकारी डाँ विजयकुमार थोरात यांनी दिली.
दरम्यान, काल ३ तारखेपर्यंत सुमारे २२५ व्यावसायीकांनी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात टेस्ट करुन घेतली असून यात दोन दिवासांपूर्वी ६ जण करोना बाधित आढळून आले. शहरात आज( दि.३ रोजी) ११ जण करोना पाँझिटीव्ह आढळले . भोर शहरातील आज अखेर करोना बाधितांचा आकडा ३८ वर तर ग्रामीण भागात १०३ अशा एकुण १४१ कोरोना बाधित आहेत.भोर शहरातील उर्वरीत व्यावसायीकांनी येत्या दोन दिवसांत आपली रँपिड अँन्टिजन टेस्ट करुन घ्यावी अन्यथा जे ही टेस्ट करुन घेणार नहीत अशा व्यासायीकांचा दोन तीन दिवसांत आढावा घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन त्यांचे व्यवसाय बंद करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डाँ.विजयकुमार थोरात यांनी सांगितले
भोर शहरातील व्यापारी व व्यावसायीकांनी उपजिल्हा रुग्णालयात रँपिड अँन्टिजन टेस्ट करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड उपचार केंद असल्याने अनेक व्यावसायीक टेस्ट करुन घेण्यासाठी घाबरत होते.या टेस्ट अन्य ठिकाणी करण्याची प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी व्यावसायीक व्यापारी वर्गा कडून होत आहे.