शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

वाडेबोल्हाईमध्ये गायरान हद्दीतून खासगी वीज वाहिनीप्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:08 AM

या अनधिकृत कामाबाबत आपण कोणत्या विभागातून परवानगी घेतली असेल, तर त्याची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी. गायरान हद्द गट ...

या अनधिकृत कामाबाबत आपण कोणत्या विभागातून परवानगी घेतली असेल, तर त्याची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी. गायरान हद्द गट क्र.०८९२ मध्ये केलेल्या विद्युत पुरवठा लाईन पुढील २ दिवसांत त्वरित काढून टाकावी आणि कशाच्या आधारे आपण विजेचे खांब टाकून विद्युत पुरवठा लाईनचे काम करीत आहात, त्याचा लेखी खुलासा व शासकीय परवानगी ग्रामपंचायतीमध्ये सादर करावी. अन्यथा, आपल्या धारिवाल इंडस्ट्रीज कंपनीवर कारवाई करण्यात येईल अशा विषयाची लेखी नोटीस वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीने धारिवाल इंडस्ट्रीज व संबंधित विद्युत पुरवठा वीजवाहिनी लाईन कामाचे कंत्राटदार स्वप्निल तानाजी धुमाळ यांना दिली आहे.

धारिवाल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने विद्युत पुरवठा लाईन काम गेले अनेक दिवस चालू आहे. परंतु या लाईनचे काम मागील काळात वाडेगाव-वाडेफाटा रस्त्यालगत असलेल्या वन खात्याच्या जागेतून अनधिकृत बेकायदेशीरपणे सुरू होते. याबाबत अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल गावडे यांनी संबंधित वनखात्याकडे हे काम बेकायदेशीरपणे चालू असलेबाबत तक्रार केली होती. त्याला अनुसरून वनखात्याने त्वरित गावडे यांच्या तक्रारीची दखल घेत वन खात्याच्या जागेतून बऱ्याच अंतरावर लोखंडी पोल उभारून नेलेल्या लाईनचे काम त्वरित थांबवून संपूर्ण पोल काढून लाईन काढावी अशा सूचना देताच संबंधित कंत्राटदार यांनी ती वनखात्याच्या जागेतून जाणारी विद्युत पुरवठा लाईन त्वरित काढून टाकली.

मात्र, दरम्यान पुन्हा हे विद्युत पुरवठा लाईनचे काम धारिवाल इंडस्ट्रीज या कंपनीने संबंधित कंत्राटदार यांच्या मार्फत अनधिकृत गायरान जागेतून सुरू केले असून तसेच साधू वासवानी यांच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या वन खात्याच्या जागेच्या सीमेवर नेण्याचे काम चालू केले आहे. हे काम नेमके साधू वासवानी यांच्या खासगी जागेतून चालू आहे का? नेमके वन खात्याच्या जागी चालू, याबाबत मात्र संभ्रम आहे. याची संबंधित वाडेबोल्हाई वन खात्याचे वनरक्षक रुपाली जगताप यांनी पाहणी करून हे काम थांबविले आहे व त्याची माहिती वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे.

--

कोट

या प्रकरणाची पूर्णतः चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा, वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आंदोलन करू.

-अमोल गावडे, उपाध्यक्ष - अ.भा.माहिती सेवा समिती, महाराष्ट्र प्रदेश

--

फोटो : १६ पिंपरी सांडस खासगी वीज वाहिनी

छायाचित्र ओळ:-वाडेगाव-वाडेफाटा रस्त्यालगत असलेल्या शासकीय गायरान जागेत अनधिकृपणे उभारलेले विद्युत पुरवठा लाईन लोखंडी पोल.