पुणे : चांदणी चौकात जमावबंदीचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात गजानन मारणे व त्याच्या १० समर्थकांना वारजे पोलिसांनी तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
गजानन मारणे व त्याच्या समर्थकांनी १५ फेब्रुवारी रोजी तळोजा ते कोथरूड दरम्यान जंगी मिरवणूक काढली होती. याप्रकरणी दहशत पसरविण्याबरोबच विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड व तळेगाव दाभाडे येथील गुन्ह्यांमध्ये गजानन मारणे याला जामीन मिळाला आहे. वारजे व अन्य प्रकरणात पोलीस मारणे व त्याच्या समर्थकांचा शोध घेत आहेत. मारणे याच्या मुळशीतील फार्म हाऊस तसेच त्याच्या समर्थकांच्या घरझडत्या घेण्यात आल्या. ते मिळाले नाही. त्या दरम्यानच्या काळात आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.
वारजे पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी हजर रहावे, यासाठी पोलिसांनी मारणेसह त्याच्या १० समर्थकांच्या घरांवर नोटीस चिकटवून पंचनामा करण्यात आला आहे.