शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

‘त्या’ भूखंडधारकांना नोटिसा

By admin | Published: April 26, 2016 2:16 AM

पिंपरी, तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांपैकी विहित मुदतीत विकास न केलेल्या १८० पैकी १०३ भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या

पिंपरी : पिंपरी, तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांपैकी विहित मुदतीत विकास न केलेल्या १८० पैकी १०३ भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या. त्यातील काही भूखंडांचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखले मिळाले आहेत, तर काही भूखंडांना उद्योग संजीवनी योजनेंतर्गत एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यानातील तीन भूखंड एमआयडीसीकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. पिंपरी, तळेगाव, चाकण औद्योगिक टप्प्यात सुमारे १८३ हेक्टर क्षेत्र दिलेल्या कालावधीत विकासित करण्यात आले नाही. त्या भूखंडमालकांना एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यातील उद्योग संजीवनीअंतर्गत एप्रिलअखेरपर्यंत ७७ भूखंडांना मुदत देण्यात आली आहे. एप्रिलअखेरनंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्यात आलेल्या भूखंडांना नोटीस देण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मार्चअखेरपर्यंत ताबा घेण्यात आलेल्या तीन भूखंडांतील सहा हेक्टर क्षेत्राचे वाटप केले आहे. पिंपरी औद्योगिक क्षेत्रांतर्गत दिलेल्या कालावधीत विकास न केलेल्या भूखंडांची संख्या १२८ आहे. त्यात एकूण क्षेत्र १५ हेक्टर आहे. तळेगाव पुष्पसंवर्धन उद्यानांतर्गत दिलेल्या कालावधीत विकसित करण्यात आलेल्या भूखंडांची संख्या कमी असली, तरी एकूण क्षेत्र मात्र अधिक आहे. ते सुमारे २९ हेक्टर असून, यातील सर्व भूखंडमालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यातील १८ भूखंडमालकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. त्यात तीन भूखंडांवर मात्र कारवाई करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)