शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मुठा कालव्यालगत केबल टाकणा-या कंपन्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 3:52 PM

जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत...

ठळक मुद्देकेबल्स कोणत्या कंपन्यांच्या आहेत यांचा शोध घेऊन संबंधित कंपन्यांना नोटिसा केबल्स तोडल्यावर संबंधित कंपन्यांकडे ग्राहकांच्या तक्रारी

पुणे : दांडेकर पुलाजवळ घडलेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी मुठा कालव्यालगत काही खासगी कंपन्यांच्या केबल्स आढळून आल्या आहेत. जलसंपदा विभागाची परवानगी न घेता या केबल्स अनधिकृतपणे टाकण्यात आल्या असल्याने  संबंधित कंपन्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. या ठिकाणी महावितरणच्या केबल्स असून त्यांचे स्थलांतर केले जात आहे. जलसंपदा विभागाचे  मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत. या केबल्स खासगी कंपन्यांच्या असून त्यांनी परवानगी न घेता केबल्स टाकल्याने त्या तोडून आल्या आहेत. या केबल्स कोणत्या कंपन्यांच्या आहेत यांचा शोध घेऊन संबंधित कंपन्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कालव्या जवळून महावितरणच्या केबलसुध्दा टाकण्यात आल्या आहेत.त्यातून वीज पुरवठा सुरू आहे.त्यामुळे महावितरणकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे.दरम्यान, महावितरणने परवानगी घेऊन वीजवाहिन्या टाकल्या आहेत,असे महावितरणने स्पष्ट केले आहे. कालव्याच्या बाहेरील बाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल्स आहेत. या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडे २०१६ मध्ये परवानगी घेण्यात आली; तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर जलसंपदा विभागाच्या देखरेखीखाली आणि दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत.वीज वहिन्या टाकण्यासाठी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर आहे. आता या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे..................कालव्याच्या भिंतीवर मातीचा थर आहे. कालव्यालगतची माती खोदून जलसंपदा विभागाची परवानगी न घेता खासगी कंपन्यांनी येथे केबल्स टाकल्या आहेत. या आॅप्टिक फायबर केबल्स असून, त्या कोणत्या कंपन्यांच्या आहेत, हे जलसंपदा विभागाच्या लक्षात येत नव्हते. तसेच संबंधित कंपन्या पुढे येत नव्हत्या. त्यामुळे या केबल्स तोडण्यात आल्या. केबल्स तोडल्यावर संबंधित कंपन्यांकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित कंपन्यांचा शोध लागला.आता कंपन्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जात आहे,असेही मुंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेkalwaकळवाmahavitaranमहावितरणmula muthaमुळा मुठा