पुणे : प्रस्तावित पुरंदरविमानतळ उभारण्यासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांचा यामध्ये समावेश असून, या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ठेवला आहे. त्यामुळे येत्या ६० दिवसांत या परिसरातील शेतकऱ्यांना याबाबतच्या हरकती सूचना नोंदवण्याचे आवाहन या कंपनीने केले आहे. पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावातील हद्दीचे नकाशे जाहीर केले आहे. पुरंदर येथे विमानतळसाठी २ हजार ८३२ हेक्टर जागा लागणार आहे. यासाठी कंपनीला विशेष अधिकार दिले आहेत. २ हजार ८३२ हेक्टर पैकी २ हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारणीसाठी लागणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॉन तयार करण्याचे काम यापूर्वीच कंपनीकडून डार्स या कंपनीला दिले आहे. तर उर्वरीत ८३२ हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची मुंबई येथे डिसेंबर २०१८ मध्ये बैठक झाली होती. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना नियोजन कायदा १९६६ च्या तरतुदीनुसार त्यामध्ये उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना विकास योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानुसार या कंपनीकडून हद्दीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या सात गावातील विमानतळासाठी किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. कोणत्या गावातील जमिनी यामध्ये जाणार आहे. याची सर्व्हे नंबर निहाय माहिती या नकाशांमध्ये उपलब्ध केली आहे.चौकट मुंबईतील कार्यालयात हरकती नोंदवण्याची सोयपुरंदर विमानतळासाठीच्या सूचना व हरकती शेतकºयांना नोंदविता येणार आहे. त्यासाठी मुख्य नियोजनकार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, आठवा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-५ येथील कार्यालयात हरकती देता येणार आहे. ...........................गावनिहाय भूसंपादन होणारे संभाव्य क्षेत्र - पारगाव-१०३७ हेक्टर - खानवडी-४८४ हेक्टर - वनपुरी-३३९ हेक्टर - कुंभारवळण-३५१ हेक्टर - उदाची वाडी-२६१ हेक्टर - एखतपूर-२१७ हेक्टर - मुंजवडी- १४३ हेक्टर
पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 12:21 PM
पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे.
ठळक मुद्दे शेतकऱ्यांना ६० दिवसांत हरकती- सूचना नोंदविता येणारपुरंदर येथे विमानतळसाठी २ हजार ८३२ हेक्टर जागा लागणार ८३२ हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा