किरण शिंदे, पुणे : बंद सदनिका हेरून दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या परराज्यातील अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिसांना यश मिळाले असून त्याच्या कडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत तर २ लाख २७ हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. व्यकटेंश रमेश ( २२ , रा कोथरुड, मुळ बंगलोर ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आंबेगाव बु येथे शिलाई वर्ल्ड जवळ एका घरात घरफोडी झाली होती. या गुन्हया चा तपास करत असताना सीसीटीव्हीवरुन आरोपी निष्पन्न झाला होता. तो मुळचा बंगलोरचा असून कोथरुड येथे एका पीजी मध्ये रहात होता. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्यासाठी एक पथक बंगलोरला सुद्धा गेले होते,
त्याच्याकडून आंबेगाव, बावधान आणि लोणीकंद येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शेलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे.