शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:53 AM

निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे: पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबतच शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे ही हजर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपत्नीक गजा मारणेची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला. त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी सुरूच आहे. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो ३ वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असून आजवर या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

पार्थ पवारांनी अशा गुन्हेगाराची भेट घेणं यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याची पत्नी माजी नगरसेविका असून निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी