पुणे: पुण्यातील हडपसर भागातल्या रामटेकडी परिसरात भयानक घटना घडली आहे. कुख्यात गुंड राजू शिवचरण याची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी राजुचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, (रा सर्व रामटेकडी व इतर दोघेजण अनोळखी इसम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील रामटेकडी येथे वंदे मातरम चौकात मध्यरात्री दीडच्या सुमारास हि घटना घडली. महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, आणि दोन इसमांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून राजू शिवचरणला वीट, दगड , सिमेंटचे तुकडे, तसेच लाथा बुक्क्याने मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी भाचा निखिल चव्हाण याने राजुला वाचवण्याचा प्रयत्न केला असता महेश शिंदेने त्याच्याही डोक्यात बॉटल मारून जखमी केले आणि तो पळून गेला. असे फिर्यादीत नमूद केले आहे.