शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

आता स्वारगेट निगडी डेपोतही येणार नवीन सीएनजी स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:57 IST

इतर डेपोतही सीएनजी स्टेशन सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासन सकारात्मक

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)च्या सीएनजी बसेससाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीएमपीच्या सुमारे २०० बससेना सीएनजी भरण्यासाठी आता दुसऱ्या डेपोवर जाण्याची गरज भासणार नसून स्वारगेट आणि निगडी डेपोत नव्या सीएनजी स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे पीएमपीच बसेसचा २० हजार किलोमीटरचा पल्ला वाचणार असून त्यामुळे प्रवाशांना बससेवा वेळेत मिळणार आहे.डेपोतील सीएनजी सुविधा कार्यान्वित होणारपेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेच्या (पेसो) मंजुरीनंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत स्वारगेट आणि निगडी डेपोत सीएनजीचा पुरवठा सुरू होणार आहे. सध्या मुख्य रस्त्यांपासून डेपोत येणाऱ्या रस्त्यांवर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या सुविधांमुळे पीएमपीच्या बसचा अनावश्यक पल्ला थांबेल आणि फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.२०० बसला होणार थेट फायदासध्या स्वारगेट डेपोतून ११० बस सीएनजी भरण्यासाठी न.ता. वाडी किंवा कात्रज डेपोत जातात, तर निगडी डेपोतील ९० बस चिखली डेपोत सीएनजी भरण्यासाठी जात असतात. या रिकाम्या फेऱ्यांमुळे पीएमपीला उत्पन्न मिळत नाही, उलट खर्चात वाढ होते. यामुळे बस सेवेत विलंब होतो आणि फेऱ्यांची संख्या कमी होते. मात्र, पुढील दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण होऊन नव्या सीएनजी स्टेशनमुळे ही समस्या सुटणार आहे.इतर ८ डेपोसाठीही पीएमपी प्रशासन सकारात्मकसध्या पीएमपीच्या १५ आगारांपैकी पाच ठिकाणी (न.ता. वाडी, पिंपरी, कोथरूड, हडपसर आणि कात्रज) सीएनजी सुविधा आहेत. स्वारगेट आणि निगडी डेपोत सीएनजी स्टेशन करण्यात सुरुवात झाली असून उर्वरित ८ डेपोतही अशा सुविधा सुरू करण्याबाबत पीएमपी प्रशासन सकारात्मक आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पीएमपीच्या बससेवेत लक्षणीय सुधारणा होईल, खर्चात १ लाखपर्यंत बचत होईल, आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असे अपेक्षित आहे.

येत्या एका ते दोन महिन्यांत स्वारगेट आणि निगडी या दोन्ही डेपोत सीएनजी स्टेशन कार्यान्वित होतील. तसेच प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढेल आणि अधिकाधिक फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.  -नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक पीएमपी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwargateस्वारगेटswargate bus depotस्वारगेट बसस्थानक