शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आता खुनासाठीचे ३०२ नव्हे तर १०३ कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना करावा लागणार ‘गृहपाठ’

By नम्रता फडणीस | Published: June 27, 2024 9:06 AM

पूर्वी विशिष्ट गुन्ह्यासाठी अधोरेखित करण्यात येणाऱ्या कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता खुनासाठी ३०२ नव्हे तर १०३ कलम असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : येत्या १ जुलैपासून भारतीय दंड विधान, भारतीय फौजदारी संहिता आणि भारतीय पुरावा कायदा रद्द होऊन भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षीदार पुरावा अधिनियम या नावाने तीन नवीन कायदे लागू होणार आहेत. न्यायाधीशांसह सरकारी व बचाव पक्षाचे वकील आणि पोलिसांनाही नवीन कायद्याचा ‘गृहपाठ’ त्यामुळे करावा लागणार आहे. एक जुलैपूर्वी जुन्या कायद्याच्या कलमानुसार दाखल गुन्ह्यांचे काय, त्याबद्दल स्पष्टता नसल्याने काहीसा संभ्रमही असल्याचे मत वकिलांनी नोंदविले.

वकील मंडळींमध्ये नाराजी

  • पूर्वी विशिष्ट गुन्ह्यासाठी अधोरेखित करण्यात येणाऱ्या कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता खुनासाठी ३०२ नव्हे तर १०३ कलम असणार आहे.
  • ब्रिटिश काळात लागू करण्यात आलेले कायदेच स्वातंत्र्यानंतरही वापरले जात आहेत, अशी टीका सातत्याने केली जात होती.
  • आता त्यात बदल होत असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी वकिलांचे मत विचारात घेणे आवश्यक होते, याकडे वकिलांनी लक्ष वेधले आहे. 

नुसते कायद्यांचे नाव नाही बदलले तर त्यातील कलमे व त्यातील तरतुदी थोड्या फार प्रमाणात बदलल्या आहेत. शिक्षा बहुतांश पूर्वीच्याच कायद्याप्रमाणे आहेत. त्यामुळे नवीन कायद्याला सामोरे जाताना पोलिसांना, न्यायाधीशांना, समाजाला व खासगी वकिलांना थोडा त्रास होणार आहे. या कायद्यांवर अधिक चर्चेची गरज होती. - ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

पूर्वी कायद्यामध्ये ‘ज्युरी’ची व्याख्या होती. पण, इंग्रज गेल्यानंतर आता त्याची गरज राहिली नाही. भारतीय दंड संहितामध्ये २ ते ५४ पर्यंतच्या व्याख्या आता नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यात व्याख्या २ अंतर्गत समाविष्ट केल्या आहेत. फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली तर त्याला काय शिक्षा होईल यासाठी स्वतंत्र कलमे लावली आहेत. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांबाबतही तरतुदी समाविष्ट केलेल्या आहेत. - ॲड. लीना पाठक, सरकारी वकील

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय