पुणे :
पुण्यातील एम्प्रेस गार्डनमधील वृक्ष आता स्वत:ची माहिती एका क्लिकवर सांगणार आहेत. या वृक्षावरील एक बटन दाबल्यानंतर ते ही माहिती सांगतील. त्यामुळे एम्प्रेस गार्डनमधील वृक्ष बोलके होणार असून, त्यासाठी साडे आठशे वृक्षांवर क्यूआर कोड लावले आहेत.
एम्प्रेस गार्डनमध्ये दोनशे वर्षांहून अधिक आयुष्य असलेले दुर्मीळ वृक्ष आहेत. आता या वृक्षांवर क्यूआर कोड लावल्याने झाडांचे नाव व संपूर्ण माहिती समजू शकणार आहे. सहा महिन्यांपासून त्यावर काम करण्यात येत होते. वनस्पती अभ्यासक डॉ. श्रीनाथ कवडे यांनी जबाबदारी घेतली असून, त्यासाठी बेळगावच्या डॉ. प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.
दुर्मीळ वृक्ष :कुसूम १ऐन १पतंगवेल १कांचन वेल २ताडगोळा ४कळंब १गोरखचिंच ३धावडा ३कदंब २लकुच ५काटेसावर ४ गारंबीचा वेल १रुद्राक्ष २शिकेकाई वेल १किनई -पांढरा शिरीष ७
गार्डनमध्ये फिरण्यासाठी विद्यार्थी, नागरिक येतात. येथील मोठमोठी झाडं ते पाहतात. परंतु, त्यांना झाडांची नावे माहिती नसतात. त्यामुळे आम्ही क्यूआर कोडचा उपाय केला आहे. झाडांवर एक बटनही लावले जाणार असून, ते दाबल्यानंतर झाडाची माहिती ऐकता येईल.- डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पती संशोधक