पुणे : केरळमध्ये अालेल्या पुरामुळे तेथील जनजीवन माेठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले अाहे. लाखाे लाेक या पुरात बेघर झाले. तर अनेकांना अापले प्राण गमवावे लागले. केरळसाठी भारतातील विविध भागातून मदतीचा अाेघ सुरु अाहे. यात अाता मराठी कलाकार सुद्धा पुढे अाले असून अमर फाेटाे स्टुडिअाे या नाटकाच्या दाेन प्रयाेगांचा नफा हा केरळ पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार अाहे. कलेतून या पुरग्रस्तांना थाेडी का हाेईना अाम्ही मदत करु शकताे या विचाराने अाम्ही केरळ पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे अभिनेता तसेच अमर फाेटाे स्टुडिअाे या नाटकाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या अमेय वाघ याने लाेकमतशी बाेलताना सांगितले.
अमर फाेटाे स्टुडिअाे या नाटकाचे मुंबईत हाेणाऱ्या दाेन नाटकांचा नफा हा पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदतनिधी मध्ये देण्यात येणार अाहे. अमर फाेटाे स्टुडिअाे हे नाटक सध्या रंगभूमिवर गाजत अाहे. तरुण कलाकारांची फाैज असलेल्या या नाटकाने नुकताच 250 प्रयाेगांचा टप्पा देखील पार केला अाहे. या 250 व्या प्रयाेगाच्या दिवशीच मुंबईतील प्रयाेगांचा नफा केरळ पुरग्रस्तांसाठी देणार असल्याचे नाटकाच्या टीमकडून जाहीर करण्यात अाले. याविषयी बाेलताना अमेय वाघ म्हणाला, अामच्या नाटकाचे निर्माते सुनिल बर्वे यांच्या डाेक्यात ही कल्पना सर्वप्रथम अाली. अाम्ही सर्वांनीच लगेच याला हाेकार दिला. केरळच्या पुरग्रस्तांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे अाम्हा सर्वांनाच वाटत हाेते. सुनिल बर्वेंबराेबरच मी, सुव्रत जाेशी, सखी गाेखले अाम्ही सुद्धा या नाटकाचे सहनिर्माते अाहाेत. अाम्ही सर्वजण कलाकार असल्याने कलेच्या माध्यमातून अापण केरळ पुरग्रस्तांना करुयात असे अाम्ही ठरवले. त्यामुळे मुंबईतील दाेन प्रयाेगांचा नफा हा अाम्ही केरळ पुरग्रस्तांना मदत म्हणून देणार अाहाेत.
या नाटकाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाला, केरळ पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचा घेतलेल्या निर्णायाचा मला अानंदच अाहे. सध्या हे नाटक रंगभूमिवर गाजत अाहे. या नाटकाचा नफा हा चांगल्या कामासाठी वापरला जाताेय ही महत्त्वाची गाेष्ट वाटते.