पुणे : पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा सुरु आहे. संपुर्ण महाराष्ट्रतून असंख्य नागरिक सभेला उपस्थित राहिले आहेत. पुणेकरही रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तेही सभेसाठी आवर्जून आले आहेत. सभागृहात जागा पुरत नसल्याने नागरिकांना बाहेरही बसायची सोय मनसैनिकांनी केली आहे. जागेवरूनच सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी सर्वांवर निशाणा साधला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी जागा देण्यास नकार दिला जातो. तर इथून पुढे आम्हाला नाही तर कोणालाच नाही असा इशारा यावेळी राज यांनी दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, सभेसाठी सुरुवातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यांनी सभेला जाग देण्यास नाकर दिल्याने कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील जाग निश्चित केली. पण पावसाचे वातावरण असल्याने तीही रद्द करण्यात आली. अखेर गणेश कला क्रीडा मंचला सभा घेण्याचे ठरवण्यात आले. पण आता इथून पुढे सप महाविद्यालयच्या जागेत आम्हाला नाही तर कोणालाच सभा घेऊ देणार नाही असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.
राज ठाकरेंची सभा २१ ते २८ मे दरम्यान पुण्यात होणार होती. त्यासाठी शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.
डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीपात्रातील सभा रद्द झाली
शासकीय यंत्रणेने केलेल्या सुचने नुसार मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील जागा निश्चित करण्यात आली होती. सदर ठिकाणी या अगोदरही मनसेच्या सभा झाल्या आहेत. या बाबतच्या संबंधित यंत्रणेच्या नाहरकत पत्र आपल्याला आम्ही देऊच तरी सदर ठिकाणी सभेसाठी स्टेज उभारणीस सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेट बांधण्यास तसेच विदयुत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्यास परवानगी पदाधिकाऱ्यांनी मागितली होती. तसेच सभेच्या दिवशी शनिवार दि २१/५/२२ रोजी स्पीकरच्या वापरास परवानगी द्यावी हि विनंती त्यांनी केली होती. परंतु पावसाचे कारण देऊन सभा रद्द केली.