पुणे : मी टू ची चळवळ भारतात जाेर धरत असताना अाता पुण्यात नवीन चळवळ उभी राहत अाहे ती म्हणजे फी टू. पक्षकारांचे अाराेपपत्र घेऊन काेर्टात त्यांना निर्दाेष साेडविण्यासाठी जे कष्ट घेतात त्या वकीलांचीच बाजू घेण्यासाठी काेणी नाही. त्यामुळे अाता फी टू ही चळवळ पुण्यातील वकीलांनी सुरु केली असून या अंतर्गत ज्या पक्षकारांनी त्यांच्या फी चे पैसे बुडवले अाहेत, त्यांची नावे साेशल मिडीयावर जाहीर करण्यास सुरुवात केली अाहे. या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त वकील यात भाग घेत अाहेत.
मी टू चळवळीमुळे अनेक महिला पुढे येत अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फाेडू लागल्या. या चळवळीमुळे अनेक बड्या लाेकांचे खरे चेहरे जगासमाेर अाले. याच चळवळीवरुन प्रेरणा घेत पुण्यातील वकील अतीश लांडगे यांनी फेसबुकवर फी टू ही चळवळ सुरु केली अाहे. या अंतर्गत ज्या पक्षकारांनी त्यांची फी दिली नाही त्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी सुरुवात केली. पाहता पाहता त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वकीलांनी त्यांना समर्थन दिले असून लवकरच याबाबतची पुढची दिशा ठरविण्यात येणार अाहे.
लांडगे म्हणाले, मी टू या चळवळीतूनच मला फी टू ही चळवळ सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकदा काही गुन्हेगार त्यांचे वकीलपत्र घेतलेल्या वकीलांना फी देत नाहीत. असे फी बुडवलेले पक्षकार दुसऱ्या वकीलांकडे केस घेऊन जातात. यात वकीलांची फसवणूक हाेत असते. त्यामुळे वकीलांमध्ये अशा पक्षकारांविषयी जागृती व्हावी यासाठी ही चळवळ सुरु करण्यात अाली. याला एकाच दिवसात चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक वकीलांनी मला समर्थन दिले अाहे. लवकरच अाम्ही बैठक घेऊन यासंबंधी एखादं फेसबुक पेज सुरु करण्याचा विचार करत अाहाेत.