शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

Maharashtra Weather Update: आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावसाची सांगता होणार

By श्रीकिशन काळे | Published: October 22, 2024 4:35 PM

येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत

पुणे : सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस आता विश्रांती घेणार असून, या मॉन्सूनची सांगता ऑक्टोबर अखेर होणार आहे. तसेच ‘ला-निना’ अजूनही दृष्टीपथात नाही, त्यामुळे लगेच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र ह्या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही. एक नोव्हेंबर नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते. जोपर्यंत 'ला- निना' अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते. 'ला- निना' च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या वेळी नक्कीच स्पष्ट करता येतील.

सध्या काही ठिकाणी होत असलेला पाऊस शेतकामासाठी काहीसा अडचणींचा ठरत असला तरी आता हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा असून, रब्बीची हंगामाची शेतजमीन बैठक तयार करण्यास मदत करणारा आहे, असे खुळे यांनी स्पष्ट केले.

हलक्या पावसाची शक्यता

राज्यामध्ये शनिवारी (दि.२६ ते २९) मंगळवारपर्यंतच्या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसNatureनिसर्गenvironmentपर्यावरणSocialसामाजिकTemperatureतापमान