शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 20:03 IST

‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे. 

ठळक मुद्देबारामती लोकसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर पोस्ट

बारामती : ‘आम्ही दिलेला शब्द पाळला, आघाडी धर्म पाळला’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत बारामती लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचित केले...  बारामती लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदराव सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा १ लाख ५४ हजार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही लक्ष घातले होते. बारामती मतदार संघाचे समन्वयक असलेले भाजपचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दादा, बिटीया गिरणी चाहिए’ असा संदेश आपल्याला खुद्द पंतप्रधान मोदी यांनी दिला होता, असे सांगितले. त्यामुळे या मतदार संघातील लढत भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघात सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले होते. परिणामी बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा या तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आघाडीधर्मासाठी तयार करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर होते. इंदापूरमध्ये माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभेला राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. तर पुरंदरमध्ये संजय जगताप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. तसेच भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांबरोबर संघर्ष आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने देखील राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या या तिन्ही नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पडद्याआडून मोठे प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या देखील उडवण्यात आल्या. मात्र लोकसभेचे निकाल हाती आल्यावर या तीनही तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांना चांगले मतदान झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे. ----------------------------

 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस