शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, दक्षता घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:07 AM

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच हळूहळू पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ...

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच हळूहळू पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा सरासरी २५० ते ३०० च्या दरम्यान आहे. हा आकडा जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसत आहे.

कोरोनाची पहिली लाट साधारणपणे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. मोठ्या प्रमाणावर खाटा आणि रुग्णालयांमधील व्यवस्था वाढविण्यात आल्यानंतरही रुग्णालयात खाटा कमी पडू लागल्या होत्या. यासोबतच आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा मिळत नव्हत्या. आॅक्सिजनचाही पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.

एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले होते. सर्वाधिक मृत्यूही याच काळात झाले. ही लाट जून महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर राज्य शासनाने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथील केले होते. हॉटेल रेस्टॉरंट बार यांना रात्री दहा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली होती. तर, दुकानांना रात्री आठपर्यंत परवानगी देण्यात आली होती. नागरिकांची होत असलेली गर्दी, अद्यापही नियमांचे गांभिर्याने न होणारे पालन, मास्क वापरण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. रुग्ण वाढ होऊ लागल्यानंतर पुन्हा आढावा घेऊन वेळा पुन्हा कमी करण्यात आल्या. मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

====

तारीख बाधित बरे झालेले मृत्यू

०२ जुलै । २६९ । २२० । ०५

०३ जुलै । ३४४ । २८३ । ०७

०४ जुलै । ३१६ । ३२९ । ०६

०५ जुलै १५० । २४९ । ०५

०६ जुलै २६८ । २२६ । ०५

०७ जुलै ४३२ । २७१ । ०६

०८ जुलै ३३१ । २५३ । ०८

०९ जुलै ३१४ । २३१ । ०७

१० जुलै ३२० । ३०२ । ०५

====

मागील पाच आठवड्यातील स्थिती

आठवडा बाधित तपासण्या टक्केवारी

४-१० जून । २, ०७१ । ४२,९८६ । ४.८२

११-१७ जून । १, ७९७ । ३७,४०१ । ४.८५

१८-२४ जून । १, ७२९ । ३६,०५८ । ४.७७

२५ जून -०१ जुलै । १, ९७७ । ३९,६५४ । ४.८९

०२-०८ जुलै । २, ११० । ४१,५९६ । ५.००