मंगळवारी ओतूर नेतवडमाळवाडी, हिवरे खुर्द येथे प्रत्येक गावात एक एक रुग्ण डुंबरवाडी, खामुंडी या प्रत्येक गावात दोन दोन असे ७ नवीन रुग्ण सापडले आहेत .
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १हजार १३२ झाली आहे. या पैकी १ हजार ५६ बरे झाले आहेत. २३ कोविड सेंटर १७ जण घरीच उपचार घेत आहेत. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथील १०६ पैकी ९५ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवड येथील बाधितांची संख्या ८८ झाली असून ८२ बरे झाले आहेत. ६जणांचा मृत्यू झाला आहे. डुंबरवाडी येथील ७३ पैकी ६७ बरे झाले आहेत. ६ जण उपचार घेत आहेत. हिवरे खुर्द येथील ७३ पैकी ६६ बरे झाले आहेत. २ जण घरीच उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली.