शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भीमाशंकर अभयारण्यात शेकरूंची संख्या वाढली

By admin | Published: May 25, 2017 2:51 AM

महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणीविषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात दि. ५ ते ८ मेदरम्यान गणना केली गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणीविषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात दि. ५ ते ८ मेदरम्यान गणना केली गेली. संपूर्ण जंगलात १३,२३० वापरातील घरटी आढळली असून त्यांमध्ये अंदाजे २,२०३ शेकरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेकरूंची संख्या समाधानकारक असणे हे चांगल्या जीवसृष्टीचे प्रतिक असून भीमाशंकर मध्ये शेकरूंना अजून चांगले पर्यावरण मिळावे यासाठी अभयारण्यातील व अभयारण्या लगत असलेल्या जंगलामधील झाडांची सलगता जपण्यासाठी वन्यजीव विभाग विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सहायक मुख्य वनसरंक्षक किर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले. शेकरूंसाठी भीमाशंकरचे जंगल संरक्षित अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे अभयारण्य ११४ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून भीमाशंकर अभयारण्य क्र.१ व २ अशा दोन भागात विभागले गेले आहे. या दोन भागातील १९ बीटांमध्ये शेकरूंची गणना घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूची नोंद घेवून केली गेली. घरटी पाहताना वापरलेली, दुरूस्तीची गरज असलेली, सोडून दिलेली व गर्भ घरटी अशा चार प्रकारची घरटी शोधून नोंदी केल्या गेल्या. घरट्यांच्या नोंदी घेताना ठिकाण, झाडाचा प्रकार, शेकरू प्रत्यक्ष दिसल्यास त्याचे ठिकाण याच्या नोंदी अक्षांश रेखांशासह जीपीएसवर घेण्यात आल्या. यासाठी मागील वर्षी जीपीएसद्वारे केलेल्या मोजणीची मदत घेण्यात आली. यामध्ये शेकरू वावर असलेल्या १३२३० घरट्याच्या नोंदी झाल्या. सर्वसाधारणपणे एक शेकरू ६ ते ८ घरटी बनविते त्यानूसार अभयारण्यात २२०३ शेकरू असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. तर शेकरूंची गणना करताना ४९० शेकरू दिसून आले. भीमाशंकर अभयारण्य क्र. २ मध्ये शेकरूंची संख्या कमी असते मात्र यावर्षी येथील नांदगाव, खांडस, डोंगरनाव्हे, रचपे परीसरातही शेकरूंची घरटी आढळून आली तर भीमाशंकर अभयारण्य क्र. १ मधील कोंढवळ, निगडाळे, भट्टी, गुप्तभीमा, कुंभारखाण, आहुपे, देवराई या ठिकाणी मोठया प्रमाणात घरटी आढळून आली. करप, आंबा, फणसाडा, माकडलिंबू, जांभुळ, हिरडा या झाडांची फळे, पाने शेकरू आवडीने खातात व याच झाडांवर घरटी करून रहातात. त्यामूळे अशा झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात या झाडांनी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. अभयारण्यालगत असलेल्या गावांमधील झाडांची सलगता जपली गेल्यास शेकरूंची संख्या टिकेल. शेकरूचे आयुष्य ८ ते ९ वर्षांचे असते. एका शेकरू चे प्रादेशिक क्षेत्र १ ते ५ हेक्टर असू शकते. यामध्ये शेकरू झाडाची पाने, काटक्या यांच्या सहाय्याने घुमटाकार घरटी बनवतो.शेकरू डिसेंबर-जानेवारी महिन्यात मिलन करतात. एक मादी दरवर्षी प्रजनन करेलच असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाट्याने वाढत नाही. शेकरू वर्षातून एक वेळा एका बछड्याला जन्म देतो. मादी सहा महिने पिलाचे संगोपन करते. सर्प व गरूड शेकरूची शिकार करतात. शेकरू मोठ्या आकाराच्या गर्भ घरट्यात पिलांना जन्म देतात. त्यामूळे ही गर्भ घरटी मोठ्या आकाराची असतात. प्रगणनादरम्यान अशी मोठ्या आकाराची घरटी जास्त प्रमाणात दिसली तर शेकरू संगोपनाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब समजली जाते. ही गर्भघरटी भीमाशंकर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात दिसून आली.