कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे मागील महिनाभरातील आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसते. दि. २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत शहरात एकुण २२ हजार ८०० चाचण्या झाल्या होत्या. त्यामुळे सुमारे २४०० नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर प्रत्येक आठवड्यातील चाचण्या व रुग्णांची संख्या घटत गेली आहे. मागील महिनाभरातील सर्वात कमी चाचण्या दि. २० ते २६ डिसेंबर यादरम्यान झाल्या. तसेच याच कालावधीत सर्वात कमी १५१५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे सलग पाचव्या आठवड्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली राहिला आहे. मागील आठवड्यात हा दर ८.९८ टक्के एवढा होता.
दरम्यान, शहराचा एकुण पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत असून, सध्या १९.६९ एवढा आहे. तर घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जवळपास ९५ टक्क्यांवर पोहचली आहे. सुमारे १ लाख ७८ हजार रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. मागील आठवड्यात चाचण्यांच्या संख्येने ९ लाखांचा टप्पा पार केला.
-----------------
मागील काही आठवड्यातील स्थिती
कालावधी चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यू दर
२० ते २६ डिसें. १६,८६२ १५१५ ८.९८ १.७८
१३ ते १९ डिसें. १७,७५५ १७३० ९.७४ १.९६
६ ते १२ डिसें. १९,४०४ १६४१ ८.४५ २.६२
२९ नोव्हें. ते ५ डिसें. २०,३१४ १९७५ ९.७१ १.२६
२२ ते २८ नोव्हें. २२,८६१ २४१२ १०.५५ १.३२
---------------------------------------------------------------