२४ फेब्रुवारी रोजी ओतूर शहरात १ व धोलवड गावात ३ कोरोना पाॅझिटिव्ह असे एकूण ४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरात बाधितांची संख्या ९१७ झाली आहे .त्यापैकी ८५९ बरे झाले आहेत. ११ जण उपचार घेत आहेत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरात मंगळवारी १ बुधवारी १ असे कोरोना बाधित रुग्ण सापडले त्यामुळे ओतूर शहरातील बाधितांची एकूण संख्या ५६८ झाली असून त्यातील ४४२ बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत. २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ३३ झाली आहे. २४ बरे झाले आहेत ५ जणावर उपचार सुरू आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
परिसरात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे पालन करावे. मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. बाजारात दुकानात सोशल डिस्टंन्सचे पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो, असे डॉ. सारोक्ते म्हणाले.