लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयसीएसई बोर्डाच्या (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षेच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. आयसीएसईमध्ये देशात पहिल्या आलेल्या मुस्कान पठाण हिने १०० पैकी ९९.४० टक्के गुण मिळविले, तर ९९ टक्के गुण मिळविणारा राघव सिंघल तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे एक-एक गुणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड (आयसीएसई) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले. आयसीएसई व आयएससी बोर्डाच्या शाळांची संख्या ही अत्यंत मर्यादित आहे. या बोर्डांचा अभ्यासक्रम हा अत्यंत कठीण समजला जातो. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवित यश संपादन केले आहे.सेंट मेरी स्कूलच्या १९९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४३ इतकी आहे. विद्या प्रतिष्ठान मरगपट्टा सिटीच्या ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ इतकी आहे. ब्ल्यू रिचच्या २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या सर्वांनी चांगले यश मिळविले आहे. बिशप स्कूलच्या कॅम्प शाळेतील २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ७१ जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. बिशपच्या कल्याणीनगर शाळेतील ३१५ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी १०७ जणांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळविले. उंड्री येथे २०८ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६६ जणांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.आयएससी (बारावी) परीक्षेमध्ये हचिंग्स कॉलेजच्या श्रीतन वर्मा याने कॉमर्समधून ९०.२५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. सायन्स शाखेमधून सिद्धेश कुडले याने ८४ टक्के मिळवित पहिला क्रमांक पटकाविला. बिशप स्कूलच्या चैतन्य दोषीने ९७.५ टक्के, मुकुल महाडिकने ९६.७५ टक्के, अमानतुल्ला नाशिकवाला हिने ९६.५ टक्के गुण मिळविले.विद्यार्थ्यांमध्ये एका-एका गुणावरून मोठी स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. मुस्कानसह बंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील आश्विनी राव हिलादेखील ९९.४ टक्के गुण मिळाले असून दोघी संयुक्तपणे देशातून पहिल्या आल्या आहेत.निहाल रहेजाने मिळविले ६६ टक्केल्ल बिशप स्कूलमधील निहाल रहेजा या अंध विद्यार्थ्याने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. अडचणींवर मात करून रहेजा याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे शाळेतील शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.
नव्वदी पार करणाऱ्यांची संख्या मोठी
By admin | Published: May 30, 2017 2:58 AM