शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीव्र इच्छुकांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 12:26 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे...

ठळक मुद्देउमेदवारी अंतिम करण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसे इच्छुकांची संख्या कमी

सुषमा नेहरकर-शिंदे- पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधूनपुणे शहरात आमदारकीसाठी तीव्र इच्छुक असलेले मातब्बर निवडणुकीतून माघार घेऊ लागले आहेत. ‘यंदा आमदार व्हायचेच,’ म्हणाणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुक आता ‘पक्षाने लढायला सांगितले तर लढू,’ असे म्हणू लागले आहेत. यामुळे दोन-अडीच महिन्यांपूर्वी आठ मतदार संघातून इच्छुक असणाऱ्या ५२ जणांची संख्या आता निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. कोथरुडसह काही मतदारसंघामधून तर एकही जण उमेदवारीसाठी पुढे न आल्याने पक्षनेतृत्वही हतबल झाले आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे. -राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगच्या जोरदार चर्चा आहेत. सर्वच पक्षांकडून जागा व उमेदवार निश्चितीचे काम अंतिम टप्प्यावर असून यासाठी बैठका, गुप्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे झाली. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन महिन्यांपूर्वी ‘राष्ट्रवादी’ने इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात ‘राष्ट्रवादी’चे बाल्लेकिल्ले समजल्या जाणाऱ्या खडकवासला, हडपसर, वडगावशेरीमध्ये तर आमदारकीसाठी प्रचंड रस्सीखेच होती. परंतु, उमेदवारी अंतिम करण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसे इच्छुकांची संख्या कमी होत आहे. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्षपदी निवड झालेल्या रूपाली चाकणकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके इच्छुक आहेत. पंरतु आमदारकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या रूपाली चाकणकर यांनी पक्षाने प्रदेशाध्याक्षपदाची जबाबदारी दिली असल्याने आमदारकीची निवडणुक लढविण्यास आता इच्छुक नसल्याचे सांगितले. तर, दत्ता धनकवडे यांनीदेखील अप्रत्यक्ष निवडणुकीमधून माघारी घेतली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच असताना आता अनेक जण निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाने लढायला सांगितले तर लढावावेच लागेल, आम्ही लढणारे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. हीच परिस्थिती वडगावशेरी मतदारसंघात देखील तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरुड मतदारसंघात ‘उमेदवारी नको रे बाबा’ असे पक्षातले कार्यकर्ते म्हणत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शहरातील महत्त्वाच्या नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारElectionनिवडणूक