पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी अजून एका ५७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. मृत व्यक्तीचे घशातील स्रावाचे नमुने १९ मार्चला तपासणीसाठी पाठवल्यानंतर २० मार्चला स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. त्या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. अखेर २४ मार्चला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्याला ‘हाय अलर्ट’चा इशाराही दिला आहे. नागरिकांनी किरकोळ ताप आल्यास दुर्लक्ष न करता तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १९ वर
By admin | Published: March 25, 2017 4:13 AM