शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:00 AM

मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे.

ठळक मुद्देमागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत

पुणे : जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला असून त्यामुळे पुणे शहर व लगतच्या भागातील वाहनांची संख्या जवळपास ३९ लाख एवढी झाली आहे. तसेच मागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे. त्यामध्ये तब्बल ३ लाख केवळ दुचाकी आहेत.मागील काही वर्षांपासून पुणे शहर व लगतच्या परिसरातील उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी वेगाने वाढत गेल्याने लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढीचा वेग अधिक आहे. आरटीओच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात. जिल्ह्याचा विचार केल्यास पुण्यामध्ये शहरासह सासवड, शिरूर, भोर, वेल्हा, हवेली तर पिंपरी चिंचवडमध्ये शहरासह जुन्नर, मावळ, लोणावळा, खेड हा भाग येतो. बारामतीअंतर्गत बारामतीसह इंदापुर व दौंड हे तीन तालुके आहेत.आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये साहजिकच पुणे शहराचा वाटा अधिक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ लाख ७५ हजार तर बारामतीमध्ये ४ लाख ६ हजार अशी एकुण ६१ लाख ७० हजार वाहने विभागात नोंदविली गेली आहेत. मागील वर्षभरात पुण्यामध्ये २ लाख ६१, पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५४ हजार तर बारामतीमध्ये ३१ हजार ५०० वाहनांची नोंदणी झाली. -----------पुणे जिल्ह्यातील वाहनांची एकुण संख्याविभाग            वाहन संख्यापुणे (एमएच १२)        ३८,८८,६९०पिंपरी चिंचवड (एमएच १४)    १८,७५,८२१बारामती (एमएच ४२)        ४,०६,०८५एकुण                ६१,७०,५९६--------------------------------------मागील तीन वर्षात झालेली वाहन नोंदणीविभाग            २०१६-१७    २०१७-१८    २०१८-१९पुणे (एमएच १२)        २,७०,३०७    २,९१,११७    २,६१,४१०पिंपरी चिंचवड (एमएच १४)    १,२५,३७७    १,५४,५९१    १,५४,४४४बारामती (एमएच ४२)        २३,६६५        ३२,६८१        ३१,५३०----------------------------------------------------------------मागील पाच वर्षांतील वाहन संख्या (एमएच १२)वर्ष        एकुण वाहन संख्या२०१४-१५    २८,५०,४५१    २०१५-१६    ३०,७२,००३२०१६-१७    ३३,३७,३७०२०१७-१८    ३६,२७,२८०२०१८-१९    ३८,८८,६९०--------------------------आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये नोंदणी झालेली वाहने (एमएच १२)दुचाकी    १,७६,३१४चारचाकी    ४७,६१७रिक्षा        १६,०४४कॅब/टॅक्सी    ६,७३२इतर        १४,७०३एकुण        २,६१,४१०----------------------

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीस