शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

गुलाबी थंडी पिकांसाठी ठरतेय पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:51 PM

खेड व शिरूरचा पश्चिम भाग : रब्बीच्या पिकांना मिळणार दिलासा

शेलपिंपळगाव : आकाशातील ढगाळ वातावरण नाहीसे होऊ लागल्याने हवामानातील दमटपणा दूर होऊन पहाटे-पहाटे बोचऱ्या थंडीची चाहूल लागू लागली आहे. परिणामी रब्बी हंगामातील बहुतांशी सर्वच पिकांच्या वाढीसाठी ही थंडी लाभदायी ठरत आहे. दमट हवामानाचा रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम होऊन रोगराई गतिशील बनू लागली होती. त्यामुळे रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांना रासायनिक औषधांचा डोस द्यावा लागत होता. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचे आगमन होऊ लागल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान व भामा-आसखेड धरणातील पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढत आहे. विशेषत: या हंगामात कांदा, हरभरा, ज्वारी, मका, फुलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. मात्र बहुतांशी सर्वच पिकांना ढगाळ वातावरणामुळे उष्ण हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत होता.चालू वर्षी खरीप हंगामात दूषित हवामानाशी दोन हात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकºयांवर ओढावली होती. खरिपानंतर रब्बी हंगामातील पीक उत्पादनावर शेतकºयांची मदार असून रब्बीची पिके फुलविण्यात ते अधिक मेहनत घेत आहेत. गेल्या महिन्यापासून हवामानात प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे रब्बीच्या पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले होते.४सध्या रात्रीच्या वेळी हवामानात गारवा निर्माण होऊन बोचरी थंडी जाणवू लागली आहे. थंडीचे आगमन शेतकºयांच्यादृष्टीने आंनदायी वार्ता आहे. थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होऊन पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होणार आहे. ज्वारी, हरभरा, तसेच प्रमुख कांदापिकासाठी थंडी अधिक फायदेशीर ठरणार आहे.पोषक थंडी...४खेड तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दोन धरणांमधील शिल्लक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. मात्र मागील दिवसांत पिकांना हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.४सध्या वातावरणात तयार होत असलेला थंडावा पिकाला पोषक ठरू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे कांद्याची पात टवटवीत होण्यास, तसेच पिकाची जलद वाढ होण्यास अधिक मदत होणार आहे.तोडणीच्या पिकांनाही फायदा...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवड, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे. परंतु तोडीव पिकांना रोगराईचा फटका बसला आहे.थंडीच्या आगमनाने ही पिके पुन्हा एकदा टवटवीत होणार आहेत.शेतकºयांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमा