शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

OBC Reservation : ओबीसी आरक्षण राज्यव्यापी आंदोलनाची पहिली ठिणगी बारामतीत पडणार; २९ जुलैला एल्गार महामोर्चाचे आयोजन  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 7:56 PM

एल्गार मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार...

बारामती: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या खडाजंगी सुरु आहे. याच दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाची पहिली ठिणगी बारामतीत पडणार आहे. याबाबत नुकतीच महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

येत्या २९ जुलैला बारामतीमध्ये पक्ष विरहित एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली. बारामती येथे ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.5) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एल्गार मोर्चाची घोषणा करण्यात आली.

यावेळी कृती समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ओबीसी चे राजकीय अतिरिक्त आरक्षण अवैध ठरल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे अतिरिक्त आरक्षण रद्द केले आहे. परिणामी याचं आरक्षणाच्या धर्तीवर १९९५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. परंतू, आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी प्रवर्ग रद्द करूनच निवडणुका होतील. त्यामुळे ओबीसीच्या राजकीय हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्थी पूर्ण गठन ५० टक्के आरक्षणाला संमती दर्शवली आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही. म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यात एल्गार महामोचार्चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात बारामतीपासून केली जाणार आहे. 

येत्या २९ जुलैला बारामतीमध्ये एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. या एल्गार महामोर्चामध्ये ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींचा समावेश असणार आहे. या साठी पुणे जिल्ह्यात गावोगावी घोंगडी बैठक, छोट्या मोठ्या सभा, फेसबुक, व्हाटस् च्या अँप माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.बारामती मध्ये होणारा हा मोर्चा राजकीय पक्ष विरहीत मोर्चा असणार आहे. या मोचार्ला राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये महादेव जानकर,छगन भुजबळ, एकनाथ खडसे, नाना पटोले, विजय वडेट्टीवट, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, संजय राऊत, या प्रमुख व इतर नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.-------------------------या आहेत ओबीसी कृती समितीच्या मागण्या....ओबीसी सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणना तातडीने करण्यासाठी राज्य आणि केंद्रसरकारने पावले उचलावीत.सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या या तीन अटींची पूर्तता कटावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागासलेपणाच्या प्रकाराबाबत आणि परिणामांबद्दल सद्यकालीन सखोल अनुभवाधिष्ठित चौकशी करण्यासाठी वाहून घेतलेला स्वतंत्र आयोग स्थापन करणे. आरक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून या आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण ठरवणे. कोणत्याही स्थितीत एससी/एसटी आणि ओबीसींचं एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होता कामा नये. या अटींच्या बाहेर जाऊन सर्वोच्च न्यायालय ओबीसींना आरक्षण देणार नाही. त्यामुळेच न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती राज्य आणि केंद्र सरकारला या एल्गार महामोर्चाच्या करण्यात येणार आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणState Governmentराज्य सरकारElgar morchaएल्गार मोर्चा