या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, पुणे जिल्हा सहकोशाध्यक्ष श्रीकांत कांचन आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांवर संपूर्ण किंवा अंशतः निर्बंध कायम लागू असल्याने व्यापार आणि त्यांचे अर्थकारण अडचणीत आले असल्याने, सरकारने आता त्वरित व्यापाऱ्यांवरील सर्व निर्बंध मागे घेऊन संपूर्ण वेळ व्यापार करण्याची मुभा देण्यात यावी. व्यापाऱ्यांवरील सर्व निर्बंध त्वरित उठवण्यात यावेत, कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. तरी व्यापारी वर्गाला दिलासा देण्यात यावा.
तसेच व्यापाऱ्यांकडे शासनाने पूर्वग्रह दूषित नजरेने पाहू नये, व्यवसायाच्या ठिकाणी व्यापारी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करतातच. व्यापारी हा समाजातील एक अतिशय जबाबदार प्रतिष्ठित आणि आत्मसन्मान बाळगणारा घटक आहे.
दरम्यान, कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांसाठी सरकारने त्वरित आर्थिक दिलासा पॅकेज जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भाजपचे पदाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना.