पुणे : शहरातील ५८ प्रभागांचे प्रारूप नकाशे आज (मंगळवार दि़१ फेब्रुवारी) नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आले असून, या प्रारूप नकाशावर नागरिकांना १४ फेब्रुवारीपर्यंत आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत. महापालिकेच्या विस्तारित इमारतीत तिसऱ्या मजल्यावर व सर्व क्षेत्रिय कार्यालयात त्या-त्या ठिकाणच्या प्रभागांचे नकाशे प्रसिध्द करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही हे नकाशे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.
या प्रारूपवर नागरिकांकडून सोमवार दि़ १४ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सुचना स्विकारल्या जाणार आहेत. त्यानंतर १६ फेबु्रवारीला निवडणुक आयोगाकडे या हरकती व सूचना सादर करण्यात येईल व २६ फेब्रुवारीला या हरकती व सूचनांवर सुनवणी होणार आहेत. त्यानंतर बुधवार दि़ २ मार्च रोजी शहरातील अंतिम प्रभाग रचना जाहिर होईल.