पुणे : काही चित्रपट शीर्षकापासूनच लक्षवेधी ठरतात. सोनाली एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘ओढ’ या चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले आहे. हा चित्रपट शीर्षकापासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत आणि लेखनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर लक्षवेधी ठरला आहे. अनुभवी दिग्दर्शक नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी ‘ओढ’ या चित्रपटात मैत्रीचे अदृश्य पैलू सादर केले आहेत. आज हा (१९ जानेवारीला) चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.लेखनापासून कास्टिंगपर्यंत प्रत्येक बाबतीत ‘ओढ’ या चित्रपटाने आपले वेगळेपण जपले आहे. एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ‘झांसी की रानी’ या मालिकेत शीर्षक भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ता मुख्य भूमिकेत आहे. छोट्या पडद्यावर भारदस्त कामगिरी केल्यानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून उल्का प्रथमच मराठीत दिसणार आहे. तिच्या जोडीला गणेश तोवर हा तितकाच दमदार अभिनेता आहे. नवोदित जोडी आणि प्रेमकथा वाटावी असं ‘ओढ’ शीर्षक यावरून या चित्रपटात काय दडलंय त्याचा अंदाज लावणं शक्य होत नाही. ‘ओढ’ फक्त प्रेमी जीवांचीच नसून मैत्रीचीही असू शकते, हाच विचार या चित्रपटात नागेश दरक यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. नवोदित कलाकारांच्या जोडीला मोहन जोशी, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ आदी मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार असल्याने जुन्या-नव्या कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळेल.आशयघन कथानक सुरेल संगीताच्या साथीने सादर करण्याचा प्रयत्नही ‘ओढ’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. संजाली रोडे, कौतुक शिरोडकर, अभय इनामदार आणि कुकू प्रभास यांनी या चित्रपटातील गीतरचना लिहिल्या असून, संगीतकार प्रवीण कुवर यांनी या गीतरचना जावेद अली, आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत. दिनेशसिंग ठाकूर यांचे उत्कंठावर्धक कथा-पटकथालेखन आणि गणेश कदम व दर्शन सराग यांच्यासोबत त्यांनी केलेलं अर्थपूर्ण संवादलेखन ही देखील या चित्रपटाची विशेष जमेची बाजू आहे.दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सजलेला ‘ओढ’ हा चित्रपट केवळ तरुणाईलाच नव्हे, तर आबालवृद्धांना आपलासा वाटावा असा आहे. मैत्रीसारख्या सदाबहार विषयावर आधारित असलेला हा चित्रपट खºया अर्थाने नावीन्यपूर्ण विचार मांडणारा आहे.रविकांत रेड्डी यांनी छायांकन आणि आरिफ खान यांनी कलादिग्दर्शन केलेल्या ‘ओढ’चे संकलन समीर शेख यांनी केले आहे.वेशभूषा सुनीता घोरावत तररंगभूषा प्रदीप दादा, बंधू धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.
मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारा ‘ओढ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:11 AM