लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी बीएसएनएलद्वारे तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला साईडपट्ट्या खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थेत न भरल्याने यात अडकून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. यामुळे या चाऱ्या आता वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.संपूर्ण भोर तालुक्यात ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी राज्यमार्ग, जिल्हामार्ग आणि गावातंर्गत रस्त्याच्या बाजूला चारी टाकून नवीन लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, या चारी व्यवस्थित बुजवल्या नाहीत. या चारीत पाणी साचल्यामुळे चिखल झाला आहे. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने या चारीत अडकून फसत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता भोरवरून सुटलेली कार्ले एसटीबस वडतुंबी गावाजवळ चारीत रुतल्याने ती अडकून पडली होती. यामुळे प्रवाशांना चालत जावे लागले. दुपारी ४ वाजता सुटलेली टिटेघर बस पान्हवळ गावाजवळ बंद पडल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या बंद झाल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर अपघातातून प्रवासी नागरिक बचावले आहेत.यापूर्वी नीरा-देवघर धरणाच्या रिंगरोडने दुर्गाडीकडे जाणारी एसटी बस तर साळुंगण येथेही एसटीबस चारीत अडकून प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. तर काल वरोडी व वडतुंबी येथे एसटी बस अडकून अपघात झाला आहे. आठवड्यातून एकतरी एसटी बस चारीतअडकून पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा फटका प्रवाशांना होत आहे. यावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांनी दिला आहे.ग्रामपंचायत आॅनलाईन करण्यासाठी काढलेल्या मोठमोठ्या चाºयांत पावसाळा सुरु झाल्यापासून मागील दोन महिन्यांत चार ते पाच एसटी बसगाड्या अडकून अपघात झाले आहेत. दिवसभर वाहतुकीचा खोळंबा यामुळे होत आहे. याचा फटका आगाराला होत असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.- स्वाती आवळे,आगार प्रमुख, भोरग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्टमार्च महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. धड ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या नाहीत आणि चाऱ्या चांगल्या पद्धतीने बुजवल्या नाहीत. येथील गटारेही काढली नाहीत. रस्ता खोदल्यामुळे साईडपट्ट्या खचल्या. त्यात वाहने अडकून रूतत आहेत. गटाराचे पाणी रस्त्यावर वाहिल्याने खड्डे पडत आहे. यामुळे ही कामे करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
चाऱ्या ठरताहेत वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 2:44 AM