शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शासकीय कामात अडथळा; विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:15 AM

अधिकाऱ्याला दमदाटी : माळेगाव कारखाना वजनकाटे तपासणी प्रकरण

बारामती : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत बारामती विभागाचे वैधमापनशास्त्र निरीक्षक योगेश आगरवाल यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने काटा पडताळणी व मुद्रांक करण्यासाठी आॅनलाईन पध्दतीने सुरूवातीला २५ हजार रूपये भरले.

पुन्हा त्यांनी दि.११ डिसेंबर २०१८रोजी २०,३०० रूपये आॅनलाईनने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे बारामती येथे भरले.त्यामुळे आगरवाल काटा पडताळणी व मुद्रांक करण्यासाठी माळेगाव कारखान्यात गेले. तेथे १० टनाचे २ वेब्रिज यांच्यामध्ये शासनाने विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त त्रुटी आढळल्याने अनुसूची १० नुसार सात दिवसात वेब्रिज पुन्हा पडताळणीसाठी सादर करण्याच्या अटीवर माळेगाव साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सदर वेब्रीज माळेगाव कारखान्याच्या ताब्यात देण्यात आली. त्या अनुषंगाने दि ७ जानेवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सस्ते यांनी वैधमापन निरीक्षक आगरवाल यांना फोन करून तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले.

आगरवाल यांनी सस्ते यांना दि. ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भेटण्यास बोलावले. मात्र, सस्ते एका कार्यक्रमात असल्याने दुपारी २ च्या सुमारास आगरवाल यांना भेटण्यासाठी बारामती येथील कार्यालयात नेहरु टोपी,कुरता पायजमा घातलेल्या अनोळखी इसमासह आले. सस्ते यांनी आगरवाल यांना तुम्ही माळेगाव कारखान्यावर केलेल्या कारवाईची लाज वाटते का,असा सवाल केला. सस्ते यांच्यासोबत आलेल्या इसमाने आगरवाल यांना तुम्ही थोडा कारखान्याचा विचार करायचा होता,असे विधान केले. यानंतर सस्ते यांनी तुम्ही कारखान्यात गेलाच का? तुम्ही काय कारवाई केली, असा प्रतिप्रश्न करून थोडे थांबून आम्ही काय तुमचे प्रवचन ऐकण्यास आलो नाही, असे आगरवाल यांना उद्देशुन म्हणाले. त्यावेळी आगरवाल यांनी सस्ते यांना माझे म्हणणे तुम्हाला प्रवचन वाटत असेल तर तुम्ही लेखी विचारा,असे सांगितले. त्यावेळी आगरवाल त्यांच्या जागेवरून उठत असताना सस्ते यांच्यासोबतच्या इसमाने कोठे चालला तू, असे आगरवाल यांना बजावून त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यावर आगरवाल हात सोडवुन उठत असताना त्या अनोळखी इसमाने खांदा धरुन तू बस खाली, असे आगरवाल यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा हात पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यांच्या पकडीतुन निघाल्यानंतर तु जागेवर बस तु कोठे चालला, असे म्हणुन आरेतुरे भाषेचा प्रयोग केला.दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नसस्ते यांच्यासह अनोळखी इसमाने दमदाटी करून माळेगाव कारखान्यावर केलेल्या कायदेशीर कारवाईवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.माझ्या जीविताला धोका असल्याचे आगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. या फिर्यादीवरून सस्ते यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या अनोळखी इसमाविरूध्द बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती