शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा 
2
IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी
3
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
4
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
5
30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
6
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
7
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
8
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
9
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
10
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
11
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
12
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
13
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
14
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
15
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
16
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
17
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
18
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
19
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
20
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आज महावीर जैन विद्यालयात स्नेहमेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 1:52 AM

वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘ब्रॅँड पुणे - जनरेशन नेक्स्ट’चा गजर करीत पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासन, उद्योग, व्यापार, जाहिरात आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा होईल.पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करून ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्या. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास!’, ‘कशासाठी? पुण्यासाठी’ यासारख्या मोहिमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्याकरिता ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यासारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिलांच्या सन्मानाची चळवळच बनली आहे.यंदाच्या वर्धापन दिनाची ‘लोकमत’ची संकल्पना ‘ब्रॅँड पुणे-जनरेशन नेक्स्ट’ ही आहे. पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. देदीप्यमान इतिहास, सामाजिक चळवळींनी घडविलेली नवी वाट, शिक्षणाच्या प्रकाशातून ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ अशी मिळविलेली ओळख, व्यापार-उद्योगातील कर्तृत्वातून झालेली प्रगती, साहित्य-कला-संस्कृतीच्या जपणुकीतून मिळालेले सांस्कृतिक राजधानीचे बिरुद ते आजचे शांत, सुरक्षित, प्रगतिशील, कॉस्मोपॉलिटन पुणे या सगळ्या प्रवासात सर्वांचाच हातभार लागला आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘ब्रॅँड पुणे’ ही मोहीम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक प्रशांत दीक्षित आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़महावीर जैन विद्यालयात जैन मंदिरासमोर पार्किंगची व्यवस्था‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्यानिमित्त येणाऱ्या मान्यवरांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था महावीर जैन विद्यालयातीलच जैन मंदिरासमोरील जागेत करण्यात आली आहे. बीएमसीसी रस्त्यावरून महावीर जैन विद्यालयाच्या कमानीतून आल्यावर डाव्या बाजूच्या मैदानावर मुख्य सोहळा रंगणार आहे. पार्किंगची व्यवस्था उजव्या बाजूला असणाºया जैन मंदिरासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत