निमगाव केतकी : केंद्र सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त भाजपच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या वेळी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना पौष्टिक आहारासह फळेवाटप करण्यात आले. भटक्या विमुक्त आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन वाकसे यांनी हा उपक्रम राबविला. या वेळी कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात आला.
वाकसे यांनी या वेळी निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला. काही आवश्यकता भासल्यास आम्ही आपल्या सेवेसाठी आम्ही आणि आमचा पक्ष सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही वाकसे यांनी दिली.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील खंबीर भारत देश बनविण्यासाठी कोरोनाचा समर्थ मुकाबला करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा सन्मान केला आहे. आभार भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष जामदार यांनी मानले.
या वेळी निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मिलिेद खाडे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू जठार, भारतीय किसान मोर्चाचे माऊली चवरे, अभंग ताई, गणेश घाडगे, अर्जुन भोंग, डॉ. आर्किले, डॉ. शेंडगे, डॉ. देशमुख यांचेसह सर्व नर्स, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.