पुणे : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव यांना ‘'राजमाता जिजाऊ स्त्रीशक्ती पुरस्कार'' देऊन सन्मानित करण्यात आले. राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टतर्फे लाल महालात आयोजित कार्यक्रमात ट्रस्टच्या कार्यकारिणी सदस्य मीना जाधव व उद्योजक समीरसिंह जाधवराव यांच्या हस्ते यांच्या हस्ते हर्षदा देशमुख-जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी हर्षदा यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले.
हर्षदा देशमुख म्हणाल्या, "शेकडो वर्षांपासून प्रगतीच्या आणि पुरोगामी विचारांच्या केंद्रबिंदू या महिलाच राहिल्या आहेत. महिलांनी अशाच पुढाकारातून काम केले, तर विविध क्षेत्रांमध्ये त्या नवनवी यशशिखरे गाठू शकतात. बहुतेक क्षेत्रामध्ये आज यशस्वीरीत्या महिला काम करत आहेत. समाजातील विविध घटकांनी युवतींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, त्यांचे कौतुक केले पाहिजे. युवतींच्या शिक्षणासाठी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टने काम करावे."
याप्रसंगी ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य दुष्यंत जाधव, अभयसिंह जाधवराव, विक्रमसिंह जाधव, अमित जाधव, दिग्विजय जाधवराव, अॅड. विजयसिंहराजे जाधव तसेच उद्योजक महेश बराटे, राजाभाऊ माने सरकार, अविनाश पाबळे आदी उपस्थित होते.
--------
आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, तसेच विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट कायमच प्रयत्न करत राहील. तसेच ट्रस्टतर्फे दरवर्षी १० गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करण्याचे योजिले आहे.
- समीरसिंह जाधवराव
--------