पुणे : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप उदमले यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली हाेती. अधिक माहितीनुसार, अतुल भातखळकर या ट्विटर अकाऊंटरवरून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट करण्यात आली आहे. त्यावरून सायबर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणावर अतुल भातखळकर यांनी त्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कोरोनाचा ईडी व्हेरिएंट असल्याच म्हटलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.