श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायकामधील हे आठवे स्थान असुन संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक व दु.१२ वा. महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसर व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. युवा उद्योजक संतोष गवारे व महागणपती सेवा मंडळ यांच्या वतीने १२१ अननसांचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अॅड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे वतीने भाविक, भक्तगण, ग्रामस्थ व अशा अनेक गणेश भक्तांच्या साठी आँनलार्इन दर्शन सुविधा “शेमारो मी” या अॅपवर महागणपती लार्इव्ह दर्शन सेवा यानुसार चालू केलेली आहे.
फोटो: संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला १२१ अननसांचा नैवेद्य दाखविण्यात आला.