राजगुरुनगर: खेड तालुक्यात थैमान घातलेला कोरोना आता कमी होत असतानाच पुन्हा डोके वर काढु लागला.जे करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने खासगी वैद्यकीय डाँक्टरांची ठरलेल्या मानधनावर नियुक्ती केली होती. मात्र उद्याप मानधन न मिळाल्याने खासगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देण्यास बंद केले आहे. त्यामुळे आरोग्य यत्रंणेची खळबळ उडाली आहे.
खेड तालुक्यात चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आँक्सिजन बेडचे रुग्णालय तीन महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले. या कोरोना रुग्णांसाठी राजगुरुनगर शहरातील खासगी फिजिशियन डाँक्टरांची नियुक्ती केली. रुग्णांसाठी वेळेनुसार सेवा दिली मात्र ठरलेले गेल्या तीन महिन्यात एकूण मानधनातला एक दमडीही जिल्हा परिषदेने अद्यापही न दिल्याने दोन फिजिशियन डाँक्टरांनी सेवा बंद केली. सध्या चांडोली डीसीएचसी सेंटरमध्ये रुग्ण उपचार सुरु असताना एक खासगी फिजिशियन डाँक्टर गेली तीन महिने मानधन येण्याची वाट न पहाता आपली सेवा देत असताना. आता त्यांनीही येण्यास ठामपणे नकार दिल्याने आरोग्य यत्रंणेची चागंलीच खळबळ उडाली आहे. चांडोली येथील काही गंभीर करोना रुग्णांची भिस्त सर्व फिजिशियन डाँक्टरावर असताना गेल्या तीन महिन्याचे मानधन न मिळाल्याने खाजगी सेवा देणाऱ्या डाँक्टरांची मानधनाची एक प्रकारची अडवणूक करुन रुणांना वाऱ्यावर सोडण्यासारखा प्रकार आहे. तर दोन जनरल प्रँक्टीरीशन आणि एका संगणक आँपरेटरांचे गेल्या तीन महिन्याचा मानधन रखडले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे फिजिशियन तज्ञ डाँक्टर नसल्याने आँक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार करणाऱ्या या डाँक्टरांची आवश्यकता असते. जिल्हा परिषदेने दररोज एका भेटीसाठी पंधराशे रुपये मानधन ठरले. दररोज दोन व्हिजिट करणाऱ्या फिजिशियन डाँक्टरांना दररोज तीन हजार मानधन मिळणे अपेक्षित धरले तर लाखो रुपयांचे मानधन रखडल्याचे समोर आले आहे.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम बाबा गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता.खाजगी फिजिशियन डाँक्टरांची मानधनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असुन येत्या काही दिवसात मानधन देण्यात येणार आहे.