पुणे/किरण शिंदे : समाजातील उच्च आणि श्रीमंत महिलांची ओळख करून देऊ. त्या महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील अशी ऑफर एका महिलेला देण्यात आली. अशा प्रकारचा फोन कॉल आल्यानंतर या महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलाही शिवाजीनगर परिसरातील एका उच्चभूमी परिसरात राहण्यासाठी आहे. 16 डिसेंबर रोजी या महिलेच्या मोबाईल फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरून एक महिला बोलत होती. त्यांनी फिर्यादी महिलेला "आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च व श्रीमंत (एलिट) महिलांची ओळख करून देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील" अशी ऑफर फिर्यादी महिलेला देण्यात आली होती.
दरम्यान ध्यानीमनी नसतानाही अशा प्रकारचा फोन कॉल आल्याने फिर्यादी महिला या चांगल्या घाबरल्या होत्या. अशा प्रकारच्या फोन कॉलमुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच त्यांना ते सर्व शब्द आक्षेपार्ह वाटले. त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.