पुणे : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सभापती गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत. बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी ‘पक्षाने मी पक्षात आहे का ते अगोदर जाहीर करावे, नंतरच मी राजीनाम्याचा विचार करीन,’ असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. मात्र, हा बदल राष्ट्रवादी काँगे्रससाठी मोठी कसोटी ठरू शकते.पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश मंगळवारी पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्यानुसार कामठे यांनी बैैठक घेऊन वरिष्ठांच्या सूचना पदाधिऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, महिला व बाल कल्याण सभापती वंदना धुमाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, समाजकल्याण सभापती आतिष परदेशी यांनी जिल्हा परिषदेत बैैठक घेऊन राजीनाम्याबाबत चर्चा केली. या वेळी बांधकाम सभापती मंगलदास बांदल मात्र उपस्थित नव्हते. ते वगळता सर्वांनी आपापले राजीनामे देण्याची तयारी दर्शवली असून, ते उद्या जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे राजीनामे देणार आहेत. जिल्हा परिषदेतील अध्यक्षांसह ६ पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. मात्र, त्यांच्या निवडीच्या वेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी ही निवड सव्वा वर्षासाठी असल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी)1जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँगे्रसचे ४१ सदस्य; तर कॉग्रेसचे ११, शिवसेना १३, भाजप ३, नागरी हित ३, लोकहित आघाडी, मनसे, अपक्ष आणि आघाडी प्रत्येकी एक, असे एकूण ७५ सदस्यांचे पक्षीय बलाबद आहे. यामध्ये गेल्या एक-दोन वर्षांत जिल्ह्यात अनेक राजकीय बदल आले आहेत. त्यात खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसनेचा उमेदवार निवडून आला आहे. खेड तालुक्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद बुट्टे पाटील भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या विचाराच्या एक सदस्य कमी झाला आहे. राष्ट्रवादीला बाहेरून पांठिबा दिलेले नागरी हित, अपक्ष या तीन सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. यात भर म्हणून राष्ट्रवादीतून निलंबित केलेले व सध्या बांधकाम समितीवर असलेले मंगलदास बादल यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. 2राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी ३८ सदस्यांची आवश्यकता आहे. यामध्ये वरील राजकीय बदल लक्षात घेता, राष्ट्रवादीकडे सध्या स्वत:चे असे ३९ च सदस्य आहेत. यानंतरदेखील पदाधिकारी बदल करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो. परंतु या वेळी काँगे्रसकडून उपाध्यक्षपद देण्याचा अग्रह धरला जाऊ शकतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुका विचार करता राष्ट्रवादी काँगे्रसला सध्या तरी पदाधिकारी बदल खुप मोठी कसोटी ठरू शकते.
पदाधिकारी बदल; राष्ट्रवादीची कसोटी
By admin | Published: February 04, 2016 1:21 AM