रांजणगाव सांडस : न्हावरे किसान युवा क्रांती संघटना शिरूर तालुका कार्यकारिणी वतीने शिरूर येथे पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
आतापर्यंत १२४ तालुका कार्यकारिणी निवडण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक कायदेशीर चळवळ उभी करायची आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व भेदभाव विसरून एकत्र आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिरूर तालुका अध्यक्ष दशरथ गिरी, उपाध्यक्ष संभाजी कांडगे, सचिव दादा बुळे, प्रवक्ते दत्तात्रेय रणदिवे, रांजणगाव जिल्हा परिषद गट अध्यक्ष भरत रणदिवे, न्हावरा जि. प. गट अध्यक्ष विकास भगत, पं. स. गण अध्यक्ष हिरामण करपे, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब माने, खेड तालुका अध्यक्ष शहाजी निकम तसेच शिरूर तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.