दर वर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करतात. त्यात चांगली आर्थिक परिस्थिती असणारे विद्यार्थी खासगी क्लासेस लावतात. परंतु, गाव-खेड्यातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी पुण्यात येऊन महागडे ‘क्लासेस’ लावू शकत नाही. परिणामी, त्यांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे गावातच राहून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एमपीएससी २०१९’ मध्ये अधिकारी म्हणून निवड झालेले २५ उमेदवार गावातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र आले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या सोबत राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते मदत करणार आहेत.
चौकट
शंभर जणांना मोफत प्रशिक्षण
“दोन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी राज्यभरातून निवडल्या जाणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ गरीब विद्यार्थ्यांची या मार्गदर्शनासाठी निवड केली जाणार आहे.”
-अविनाश शेंबेंटवाड, तहसीलदार.