शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे कार्यालये बंद

By admin | Published: May 11, 2017 4:13 AM

पारगाव (ता. दौंड) येथील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामावर हजर नसल्याने कार्यालये बहुतांशी वेळा बंद असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामावर हजर नसल्याने कार्यालये बहुतांशी वेळा बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गावच्या उत्तरेला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. उद्घाटनावेळी माजी मंत्री सचिन अहीर यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून हे केंद्र चर्चेत आहे. या आरोग्य केंद्राचे कर्मचारी केंद्रात मुक्कामी राहणे अपेक्षित असताना गावामध्ये खोली घेऊन राहत आहेत. बहुतांशी वेळा आरोग्य केंद्र बंद असते. ही कार्यालय नियमितपणे उघडावी, अशी मागणी ग्रामस्थ मच्छिंद्र ताकवणे यांनी केली आहे. गावच्या दक्षिणेला एकाकी तलाठी कार्यालय आहे. पारगाव व गलांडवाडीसाठी हे कार्यालय आहे. हे कार्यालय आठवड्यातील एखादा दुसरा अपवाद वगळता नियमित बंद असते. तलाठी फणसे हे खुटबावला राहतात. ग्रामस्थांना तलाठी कार्यालय बंद असल्याने मनस्ताप होतो.