शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

विद्यापीठ देईना विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:22 AM

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्रच दिले जात नाही.

- दीपक जाधवपुणे : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्रच दिले जात नाही. विद्यार्थ्यांना सगळीकडे ओळखपत्राची आवश्यकता पडत असल्याने ते स्वत:च पैसे गोळा करून आपापली ओळखपत्रे छापून घेत आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.जगातील कुठलीही शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय, खासगी अथवा स्वयंसेवी संस्था असतो, त्याच्या सदस्यांना पहिल्यांदा ओळखपत्र दिले जाते. ओळखीचा पुरावा म्हणून तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असते. विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये ओळखपत्र ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ओळखपत्रामध्ये संबंधीत विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, रजिस्टर क्रमांक, रक्तगट, फोटो आदी महत्त्वपूर्ण माहिती असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मात्र अद्यापही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची गरज वाटलेली नाही.विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान, लॉ, व्यवस्थापन आदी शाखांचे पदव्युत्तर शिक्षणाचे ५२ विभाग आहेत. या विभागांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना विद्यापीठाकडून केंद्रीकृत पद्धतीने विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाणे आवश्यक आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतके जुने असूनही अशी केंद्रीकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्था विद्यापीठाने उभी केलेली नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना विविध कारणांसाठी ओळखपत्रांची गरज भासते. अगदी बसच्या पासपासून ते आरोग्य केंद्रात उपचार घेण्यापर्यंत सगळीकडे ओळखपत्राची मागणी केली जाते. त्याचबरोबर काही वेळेस सुरक्षारक्षकांकडूनही ओळखपत्र दाखविण्यास सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विभागप्रमुखांकडे सातत्याने ओळखपत्रांची मागणी केली जायची. मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचीच व्यवस्था नसल्याने संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर अनेक बेकायदेशीर फंडे शोधून काढले आहेत. प्रत्येक विभागने त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची वेगवेगळ्या अनधिकृत व्यवस्था उभारल्या आहेत. काही विभागांमध्ये विद्यार्थीच पैसे गोळा करून स्वत:चे ओळखपत्र तयार करून घेतात, तर काही विभागांमध्ये विभागप्रमुखांकडून खासगी व्यक्तीच्या माध्यमातून ओळखपत्र तयार करून दिले जाते. मात्र विद्यार्थ्यांची सर्व एकत्रित माहिती खासगी व्यक्तीच्या ताब्यात जात असल्याने त्यातून सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठ प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.सुरक्षेला मोठा धोकासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसची सुरक्षा भक्कम करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. नुकतेच कॅम्पसमधील सुरक्षारक्षकांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे.मात्र प्रत्यक्षात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची महत्त्वाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. यातून विद्यापीठाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कुलगुरूंना पडला विसरकुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने विद्यापीठाकडून अधिकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले होते.मात्र त्याला आता वर्ष उलटून गेले तरी अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.कुणीही सहज बनवू शकतोबोगस ओळखपत्रसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याची व्यवस्थाच नाही. अनेक विभागांमध्ये विद्यार्थीच पैसे गोळा करून आपापले ओळखपत्र बनवून घेतात. त्यामुळे कुणीही सहजपणे विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे बोगस ओळखपत्र बनवून विद्यापीठात वावरू शकतो. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.- सतीश गोरे, अध्यक्ष, एनएसयूआय,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ