सप्टेंबर महिन्यात अॅड. सोमनाथ दौंडकर यांचा कोव्हिड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र वैद्यकीय उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान काळूस येथील एका रुग्णाला ओ - पॉझिटिव्ह रक्तगट असलेला प्लाझ्मा अत्यावश्यक असल्याचे दौंडकर यांना समजताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे रुग्णाच्या नातेवाईकांना भेटून प्लाझ्मा दान केला. कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी प्लास्मा थेरपी अतिशय गुणकारी व प्रभावी असल्याने कोरोनावर मात केलेल्या सर्वांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन ॲड. सोमनाथ दौंडकर यांनी केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णासाठी पदाधिकाऱ्याने केला प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:32 AM